रखडलेल्या तलाठी भरतीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होणार

रखडलेल्या तलाठी भरतीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होणार
सत्यजित तांबे यांची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा

नगर- राज्यातील काही जिल्ह्यात 2019 मध्ये झालेल्या तलाठी भरतीतील पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यातच ऑगस्टमध्ये कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात या भरतीतील पात्र उमेदवारांना ऑर्डर देण्यात आल्यानं जवळपास आठ जिल्ह्यातील परीक्षार्थींमध्ये नाराजी आहे. यापार्श्वभूमीवर युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी तलाठी भरतीकडे डोळा लावून बसलेल्या हजारो उमेदवारांना दिलासा देत भरतीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास दिला आहे. तांबे यांनी यासंदर्भात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार ना.थोरात यांनी संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी खात्री तांबे यांनी व्टिटच्या माध्यमातून दिली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post