धक्कादायक....मुलगा करोना पॉझिटिव्ह, घाबरुन वडीलांनी केली आत्महत्या

धक्कादायक....मुलगा करोना पॉझिटिव्ह, घाबरुन वडीलांनी केली आत्महत्या

सोलापूर : समाजात करोना विषाणूची दहशत कमालीची वाढत असून भितीपोटी बळी जाणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. सांगोला तालुक्यातील बामणी (शेळकेवाडी) येथे मुलाला करोनाची लागण झाल्याने त्याच्या 70 वर्षीय पित्याने भितीपोटी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंदा धोंडिबा कोळेकर (वय-70) असं आत्महत्या केलेल्या वृद्धाचं नाव आहे. घराशेजारील जनावरांच्या शेडमध्ये नायलॉन दोरीने गळफास घेऊन आनंद कोळेकर यांनी आपलं जीवन संपवलं. मयत आनंद कोळेकर यांचा मुलगा वामन आनंद कोळेकर याची 11 ऑगस्ट रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आरोग्य विभागाने त्याला कमलापूर येथील कोव्हिड सेंटर येथे दाखल केले. वामन कोळेकर यांच्या घरातील सर्व सदस्यांची आरोग्य विभागाकडून कोरोना टेस्ट केली जाणार होती. मुलगा वामन कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे आपली टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह येईल या भीतीपोटी वडील आनंदा कोळेकर यांनी शुक्रवारी पहाटे घराशेजारील जनावरांच्या पत्राशेडमधील लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post