विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकास्तरीय सहसमन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर

विद्यार्थी काँग्रेसच्या तालुकास्तरीय सहसमन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर

नगर : विद्यार्थी कॉंग्रेसच्या (एनएसयूआय) तालुकास्तरीय सहसमन्वयकांच्या नियुक्त्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आल्या आहेत. युवक व विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा समन्वयक किरण काळे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे.

नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे : 
अमोल शेटे (मूळ तालुका - श्रीरामपूर) - देण्यात येणारा तालुका नेवासासार्थक नरमासे (राहाता)  राहुरीगौरव डोंगरे (संगमनेर) -  राहाता,  राम जहागीरदार (कर्जत)  कर्जत आणि जामखेड, आदेश शेंडगे (श्रीगोंदा) -  श्रीरामपूर, शुभम वाकचौरे (अकोले) – अकोले, युवराज पवार (राहुरी) – संगमनेर, आदिल शेख (श्रीगोंदा) – पारनेर, श्रेयस सोसे (संगमनेर) – कोपरगाव, स्वराज त्रिभुवन  (शिर्डी) -  नगर शहर व नगर ग्रामीण, प्रियेश सरोदे (जामखेड) – पाथर्डी व शेवगाव, उत्तम पठारे (पारनेर) – श्रीगोंदा.

प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब आणि युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा  एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष  निखिल पापडेजा यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या एनएसयूआयचे संगठन अधिक मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी काम करतील असा विश्वास जिल्हा समन्वयक किरण काळे यांनी व्यक्त केला आहे.

नवनियुक्त सहसमन्वयकांचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरातयुवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबेआ. डॉ. सुधीर तांबेआ. लहू कानडेसंगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबेजिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखेजिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारेयुवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटेयुवक काँग्रेस - एनएसयुआय समन्वयक किरण काळेएनएसयुआय जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजानिरीक्षक अकिल पटेल आदींनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post