पुण्श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक भव्यदिव्य व्हावे

पुण्श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक भव्यदिव्य व्हावे
आ.रोहित पवार यांनी केली भरीव निधीची मागणी

नगर : सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं भव्य व देखणं स्मारक उभारण्यासाठी सरकारने पुरेसा निधी देण्याची मागणी आ.रोहित पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासमवेत अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे उपस्थित होते. आ.रोहित पवार यांनी यासाठी विशेष पाठपुरावा करण्याचे ठरवले असून त्यांनी कर्जतमधील अक्षय शिंदे यांना घेवून थेट मंत्र्यांची भेट घेवून स्मारक उभारणीबाबत सविस्तर चर्चा केली. मंत्री उदय सामंत यांनीही याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आ.पवार यांनी सोशल मिडियाव्दारे दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post