शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’मधील 2 सुरक्षा रक्षक करोनाबाधित

शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’मधील 2 सुरक्षा रक्षक करोनाबाधित

मुंबई: राज्य सरकारमधील काही मंत्री करोनाबाधित होवून पुन्हा बरे झाले असले तरी करोनाचा संसर्ग बड्या हस्तींच्या घरापर्यंत पोहचणे कायम आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे कार्यरत असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचार्‍यांनी रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. त्यात दोन जण बाधित आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे. दोन्ही सुरक्षारक्षक सिल्व्हर ओक येथेच सुरक्षेचे काम करीत होते. आता या सुरक्षा रक्षकांच्या थेट संपर्कातील लोकांचीही चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post