लागीर झालं जी..मधील भैय्यासाहेब झाले ‘देवमाणूस’


लागीर झालं जी..मधील भैय्यासाहेब झाले ‘देवमाणूस’


मुंबई: लॉकडाऊनमध्येच टीव्हीच्या चित्रिकरणाची परवानगी देण्यात आली. अटीशर्तींसहं चित्रिकरण सुरू झालं. अनेक वाहिन्यांनी नव्या मालिकांची घोषणाही केली आहे.  झी मराठीनेही नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ही मालिका आहे 'देवमाणूस'. त्या मालिकेची वेळ असणार आहे रात्री साडेदहाची. म्हणजे सध्या चालू असलेली साडेदहाची मालिका बंद होणार आहे. ही मालिका आहे रात्रीस खेळ चाले.
 ही मालिका 29 ऑगस्टला निरोप घेणार आहे. त्या जागी 31 तारखेपासून देवमाणूस ही नवी मालिका येणार आहे.
देवमाणूस ही मालिकाही थ्रिलर असणार आहे. विशेष बाब अशी की लागीरं झालं जी.. या मालिकेत भैय्यासाहेब साकारलेला किरण गायकवाड या मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहे. तर त्याच्या जोडीला असलेली नायिका ही लागिर झालं जी मधलीच शीतलीच्या काकीची भूमिका करणारी शिवानी घाटगे ही असणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post