नगर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकेचे वाटप

नगर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकेचे वाटप


     नगर - शासनाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यातीलच अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटूंबियांना शिधापत्रिका वाटप आज नगर तालुक्याचे तहसिलदार उमेश पाटील यांनी केले . दिव्यांगाना ऐन कोरोणा काळात जास्त धान्य मिळण्यास मदत होणार आहे . त्यांचा या योजनेत समावेश केला आहे. त्यामुळे रेशनवरील धान्य मिळण्यास त्यांना सुलभ होणार आहे. अशा योजनांमुळे त्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे. आता प्रातिनिधिक स्वरुपात शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे. यापुढील काळात या योजनेतील पात्र आणखीही लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार उमेश पाटील यांनी केले.

     नगर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचा प्राधान्य कुटूंब लाभ योजनेतून अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटूंबियांना शिधापत्रिकचे वाटप नगर तहसिलदार उमेश पाटील यांच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी पुरवठा अव्वल कारकुन विश्‍वास आढाव, पुरवठा निरिक्षक महादेव कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे जिल्हा अध्यक्ष रत्नाकर ठाणगे , प्रदेश उपाध्यक्ष महेश बारगजे , बाबा शेख  बाळासाहेब गायकवाड , शेखर बोत्रे , आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी रत्नाकर ठाणगे  म्हणाले, आज जे नगर तालुक्यातील तहसिल कार्यालयामार्फत दिव्यांगांना रेशन कार्ड वाटप केले ते अहमदनगर जिल्ह्यांतील पहिले तहसिल कार्यालय आहे . त्याच धर्ती वर आम्ही जिल्ह्यातील सर्व तहसिल ऑफीस ला विनंती करणार आहोत . व जिल्ह्यांतील  सर्व दिव्यांग व्यक्तींना याचा कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत . तसेच शासनाच्या विविध योजनांना लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी अपंग सेल  लढा देत आहे. विविध प्रश्‍नही मार्गी लागत आहेत. आताही दिव्यांगाचा अंत्योदय योजनेत समावेश करुन त्यांना शिधापत्रिकेचे वाटप केले आहे. यासाठी नगर तहसिल कार्यालयाचे मोठे सहकार्य मिळाले.  पुढील काळातही अशाच प्रकारचे उपक्रम अपंग सेल च्या माध्यमातून राबवून दिव्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल राहू, असे सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post