दहावी- बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोटरी करिअर फेस्टचे आयोजन

दहावी- बारावीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी करिअर फेस्टचे ऑनलाइन आयोजन : ईश्वर बोरा


अहमदनगर: दहावी- बारावीच्या परीक्षा संपता-संपताच घराघरात विद्यार्थ्यांचे करिअर, पुढील शिक्षण याविषयी चर्चा सुरू होते. मात्र, अनेकदा विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकही याबाबत संभ्रमात असतात. डोळसपणे सर्व बाबींचा विचार करून आणि योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य करिअरची निवड करणे  महत्त्वाचे आहे. आज उच्च शिक्षणाला स्पेशलायझेशन, स्किल बेस्ड लर्निंग तसेच मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच या महत्त्वाच्या घटकांची जोड मिळाली आहे. योग्य माहितीच्या आधाराने जाणीवपूर्वक निवडलेले करिअर केवळ विद्यार्थ्यांची बौद्धिक, नैतिक क्षमता वाढवत नाही, तर देशाची सामाजिक, आर्थिक बाजूदेखील बळकट करत असते. या गोष्टी लक्षात घेऊन रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रल तर्फे १०वी, १२वी, पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  दिनांक ११ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान दुपारी ४:०० ते संध्याकाळी ७:०० पर्यंत रोटरी करिअर फेस्टचे ऑनलाइन आयोजन करण्यात आलेले आहे . या पाच दिवसीय कार्यक्रमामध्ये  विज्ञान, वाणिज्य, कला, इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारिता, अश्या विविध क्षेत्राविषयी माहिती मिळणार आहे.या करिअर मार्गदर्शन सेमिनार मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आय पी एस विश्वास नांगरे पाटील, अविनाशजी धर्माधिकारी, संदीपजी पाठक, उदयजी निरगुडकर, प्रा मोहन देशपांडे, डॉ धनंजय गायकवाड, राजेश बर्गे, राहुल बोधनकर, योगीराज देवकर, कॅप्टन श्रीकांत वलवाडकर, प्रा डॉ शंकर नवले,  प्रा. शारंगपाणी कट्टी, सीए आदेश नहार हे नावाजलेले व प्रख्यात मान्यवर  लाभलेले आहेत.
त्यासाठी https://forms.gle/KyK4qNixFEDTpbR19 लिंकवर नावनोंदणी करावी व  संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब अहमदनगर सेन्ट्रल चे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवले,सचिव ईश्वर अशोक बोरा ,प्रकल्प प्रमुख मयूर राहिंज आणि पब्लिक इमेजचे चेतन अमरापूरकर यांनी केले आहे. तसेच अहमदनगर शहरातील शिक्षकांनी देखील आप आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सदर ऑनलाइन करिअर फेस्टचे लाभ घेण्याचे आव्हान करावे असे सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी ९८२३७९९९९८ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा क्लबचे  फेसबुक पेज https://www.facebook.com/Rotary3132/ वर भेट द्यावी. त्याचप्रमाणे दहावी व बारावी च्या निकालात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोटरी परिवारातर्फे रोटरीच्या अध्यक्ष सचिवांनी शुभेच्छा देवुन त्यांना त्यांच्या भावी आयुषातील अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post