बापाच्या नात्याला काळीमा...स्वत:च्याच 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा नराधम

बापाच्या नात्याला काळीमा...स्वत:च्याच 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणारा नराधम

मुंबई : मुंबईतील भाइर्ंदर परिसरातील उत्तन येथे बापाच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी बापानेच आपल्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. एका 35 वर्षीय नराधम बापानेच आपल्या पोटच्या 9 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापने पत्नी कामावर गेली असताना मुलीवर अत्याचार केले. पीडित मुलगी शेजार्‍यांकडे गेली असता त्यांनी तू शांत का आहेस असा प्रश्न विचारला असता पीडितेने रडत रडत संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून गुरुवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीला हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post