'रत्नदीप' मार्फत डॉ.सीमा सांगळे यांना पंचवीस हजारांची मदत.. VIDEO

'रत्नदीप' मार्फत डॉ.सीमा सांगळे यांना पंचवीस हजारांची मदत

जामखेड(नासीर पठाण):- ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी धाडसाने लढणार्‍या डॉ. सीमा संतोष सांगळे यांना रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर, तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या वतीने रूपये पंचवीस हजार रुपयांची मदत करण्यात आली. मदतीचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील व सचिव डॉ.वर्षां मोरे पाटील यांनी डॉ. सीमा संतोष सांगळे यांना दिला.
  या बाबत सविस्तर माहिती अशी की, जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनचे सदस्य डॉ. संतोष सांगळे व डॉ. सौ. सीमा सांगळे हे गेल्या वीस वर्षांपासून जामखेड शहरात वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून डॉ.सीमा सांगळे या ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी धैर्याने झुंज देत आहेत. मात्र सदर आजाराच्या उपचाराचा प्रचंड खर्च पाहता डॉ. संतोष सांगळे यांनी समाजातील इच्छुक लोकांनी डॉ. सीमा सांगळे यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे जाहीर भावनिक आव्हान केले आहे. त्यांच्या या भावनिक आव्हानाला साद देत सामाजिक बांधिलकी जोपासत रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटर  या संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे पाटील व सचिव डॉ. सौ.वर्षा मोरे पाटील यांनी पंचवीस हजार रुपयांची  मदत केली आहे. त्याच बरोबर समाजातील इतर लोकांही सामाजिक बांधीलकी म्हणून डॉ. सीमा सांगळे यांच्या उपचारासाठी भरीव मदत करण्याचे आवाहन डॉ.भास्कर मोरे पाटील व डॉ. सौ.वर्षा भास्कर मोरे पाटील यांनी केली आहे. या मदती बद्दल डॉ. संतोष सांगळे यांनी डॉ भास्कर मोरे पाटील व सचिव डॉ. सौ. वर्षा मोरे पाटील यांचे आभार व्यक्त केले.
 VIDEO 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post