मंत्रिमंडळाची एक बैठक छत्रपती शिवरायांच्या रायगडावर घ्यावी

मंत्रिमंडळाची एक तरी बैठक छत्रपती शिवरायांच्या रायगडावर घ्यावी
खा.छत्रपती संभाजी राजे यांची राज्यपालांकडे मागणी

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर वर्षातून किमान एकदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी अशी मागणी भाजपचे खा. छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी यासंदर्भात एक व्टिट केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवनेरी गडाला दिलेल्या भेटीवेळी प्रत्येक मंत्र्याने एक तरी गड दत्तक घेवून विकास करावा, असे आवाहन केले होते. राज्यपालांच्या या भूमिकेचे खा.संभाजी राजे यांनी स्वागत केले आहे. याबाबत व्टिटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, रायगडावर दरवर्षी कॅबिनेटची एक बैठक पार पडायला हवी. त्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला आदेश द्यावेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ध्येयाने रायगडावर राज्यभिषेक करवून घेतला, त्याची जाणीव राजकारणी आणि अधिकार्‍यांना होण्यासाठी कॅबिनेटची बैठक रायगडावर व्हायला हवी. अशा प्रकारची बैठक घेतल्याने स्वराज्याला सुराज्यात रुपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा, याची प्रेरणाही राजकारणी आणि अधिकार्‍यांना मिळेल, असं छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post