एसीबीचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांना राष्ट्रपती पदक


एसीबीचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांना राष्ट्रपती पदक

नगर : अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त देण्यात येणारे राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे. हरिष खेडकर हे मूळ श्रीगोंद्याचे असून त्यांचे प्राथमिक शिक्षणही श्रीगोंदा येथेच झालेले आहे. कोल्हापूर येथे कृषी शिक्षण घेतल्यानंतर 1992 मध्ये ते सरळसेवेने एमपीएससीमार्फत पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षकपदी भरती झाले. त्यांनी लोहमार्ग नागपूर, जालना, विशेष शाखा (पुणे), सातारा, बुलढाणा, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, ठाणे, बीड, स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद, औरंगाबाद ग्रामीण आदी ठिकाणी सेवा केली आहे. त्यांची सातारा जिल्ह्यातील कराड वाहतूक शाखा, उंब्रज पोलिस स्टेशन, पाटण पोलिस स्टेशन, एलसीबी उस्मानाबाद येथील कामगिरी विशेष उल्लेखनीय राहिली. त्यांना सेवाकाळात आतापर्यंत 431 बक्षिसे व 45 प्रशंसापत्रे मिळाली आहेत. राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह आदींनी अभिनंदन केले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post