बुडणार्‍या व्यक्तीसाठी देवदूतासारखे धावले पोलिस....व्हिडिओ

समुद्रात बुडणार्‍या व्यक्तीसाठी देवदूतासारखे धावले पोलिस....व्हिडिओ

मुंबई : पोलिस हा जनतेचा खरा मित्र असतो, याची प्रचिती वेळोवेळी सर्वांना येतच असते. मुंबईत वरळी सी फेस येथे एक वृध्द व्यक्तीला याचा अनुभव आला. वरळीच्या समुद्रकिनारी एक वृध्द व्यक्ती पाण्यात बुडत असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून बुडणार्‍या व्यक्तीला पाण्यातून सुखरुप बाहेर काढले. पोलिस नाईक अजय मते आणि अजय गवांदे यांनी अतिशय धाडसाने पाण्यात उतरत त्या व्यक्तीला वाचवले. मुंबई पोलिसांनीच हा व्हिडिओ सोशल मिडियात शेअर करून सदर घटनेची माहिती दिली.
व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post