शेती बहरात... मात्र बैलपोळ्याच्या सणावर करोनाचे सावट...व्हिडिओ

शेती बहरात... मात्र बैलपोळ्याच्या सणावर करोनाचे सावट...व्हिडिओ

शेवगाव (संदीप देहाडराय): यंदा सर्वत्र मुबलक पावसामुळे यावर्षी तालुक्यातील शेतकरी समाधानी असला तरी श्रावणी बैलपोळयाच्या सणावर मात्र कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी महत्वाचा सण असलेला बैलबोळा उत्साहाने साजरा करण्यावर कोरोनाच्या जमावबंदीचे विरजन पडले आहे. त्यामुळे प्रथमच गावोगावी भरणारा पोळा सुनासुना भासणार आहे.
      वर्षातून एकदा येणारा बैलपोळा हा सण शेतकरी वर्गातील मोठा सण असतो. शेतीसाठी राबणार्‍या बैलाची मनोभावे पूजा करुन धनधान्याने घर भरणार्‍या काळ्या आईला नैवेद्य दाखवून त्यातून उतराई होण्याचा हा दिवस असतो. गेल्या तीन चार वर्षापासून तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्याने दरवर्षीचा श्रावण अमावस्येला येणारा पोळा हा सण दुष्काळात व कोरडा साजरा करण्याची वेळ तालुक्यातील शेतकर्‍यांवर नेहमी येत असते. यंदा मात्र जूनच्या सुरुवातीपासूनच तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस आहे. ओढे,नदी नाले खळखळून वाहत आहेत. तर खरीपाची पिके ही जोमात आहेत. तर काही भागात अतिवृष्टीमुळे पिके जाण्याच्या बेतात असली तरी चांगल्या पावसामुळे शेतकरी समाधानी आहे. मात्र या सर्व आनंदाच्या क्षणी कोरोना विषाणूच्या संसर्गाने शेवगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांना ग्रासले आहे. दिवसेंदिवस बाधीत रुग्णांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे ऐकीकडे पावसाने समाधानी असलेला शेतकरी व गावकरी वर्ग मात्र कोरोनाच्या दहशतीखाली आहे. गावोगावी असलेले छोटेमोठे व्यावसायिक टाळेबंदीमुळे आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे बैल पोळयासाठी लागणा-या साहीत्याची दुकाने बाजार पेठेत किरोकोळ विक्रेत्यांनी थाटलेली नाहीत. तर काही व्यावसायिकांनी ठेवलेल्या साहित्यास मागणी नसल्याने ते तसेच पडून आहेत.
      शिवाय जमावबंदीचा आदेश सर्वत्र लागू आहे. तर दहिगावने, चापडगाव, ढोरजळगाव, फलकेवाडी, कोळगाव आदी गावे प्रतिबंधीत केलेली आहेत. त्यामुळे तालुक्यातील ग्रामिण भागात प्रथमच पोळा भरणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना घरच्या घरी हा सण साजरा करावा लागणार आहे.

शेवगावमधील परंपरा खंडीत
शेवगाव शहरातील महात्मा सार्वजनिक वाचनालयासमोर पोळा भरतो. पूर्वी ग्रामपंचायतीकडून तर आता नगरपरीषदेकडून तेथे येणार्‍या उत्कृष्ट पशुची निवड करुन त्याच्या शेतकरी मालकाचा सत्कार केला जातो. गेल्या अनेक वर्षापासून ही प्रथा सुरु आहे. मात्र यावर्षी प्रथमच ती कोरोनामुळे खंडीत होत आहे.
व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post