असंवेदनशीलतेचा कळस...करोनाबाधित वृध्देला झाडाखाली बसवून लावला ऑक्सिजन

असंवेदनशीलतेचा कळस...करोनाबाधित वृध्देला झाडाखाली बसवून लावला ऑक्सिजन

औरंगाबाद: करोना काळात आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस राबत असली तरी काही घटनांमध्ये या यंत्रणेची असंवेदनशीलताही समोर येते. औरंगाबादमध्ये एका करोनाबाधित वृध्द महिलेला कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्याऐवजी तिला बाहेरच झाडा खाली बसवून ऑक्सिजन लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोशल मिडियावर याबाबतचा फोटो व्हायरल झाला असून या प्रकारामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. औरंगाबादच्या वाळूजमधील गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये शनिवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका वृद्धेला करोनाची लक्षणं जाणवल्याने तिला गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये आणण्यात आले होते. मात्र, कम्युनिटी सेंटरमध्ये खाटा रिकाम्या असूनही या वृद्ध महिलेला सेंटर बाहेरच्या झाडाखाली बसवण्यात आले. या महिलेच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने तिला झाडाखाली बसवूनच ऑक्सिजन लावण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post