‘नया है वह’, पार्थ पवारांबाबत छगन भुजबळांची प्रतिक्रिया

‘नया है वह’, पार्थ पवारांबाबत छगन भुजबळांची प्रतिक्रिया 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांचं वर्णन 'नया है वह' या शब्दात केलं आहे. तसंच अजित पवार नाराज नसल्याचंही भुजबळ म्हणाले. पवार कुटुंबात सगळं आलबेल असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना शरद पवार यांनी फटकारलं होतं. याविषयी छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, पवार साहेबांनी सांगितलं त्यावर पुन्हा मी काही बोलण्याची गरज नाही. हिंदीत सांगायचं झालं तर 'नया है वह'.
 ते म्हणाले की, "पवार कुटुंब सगळं एकत्रित आहे, चांगलं आहे. आम्ही सुद्धा त्याच कुटुंबातील सभासद आहोत. अजितदादा पण दुखावलेले नाहीत. कोणी दुखावलेले नाहीत, सगळे एकत्रित आहोत. कुटुंबात एकमेकांना सुचवू शकतात."

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post