औसरकर मळ्यातील शेतकऱ्यांचे मोकाट जनावरांकडून नुकसान

औसरकर मळ्यातील शेतकऱ्यांचे मोकाट जनावरांकडून नुकसान
मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा : नगरसेवक प्रकाश भागानगरेनगर : शहरासह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरिकांना व
शेतकऱ्यांना त्यांच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. सारसनगर भागातील औसरकर मळा येथील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सारसनगर भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय होत आहे. शेतकरी या परिसरात वेगवेगळी उत्पादन घेत आहेत. मोठ्या प्रमामात मोकाट जनावरांचा सूळसुळाट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटास सामोरे जावे लागत आहे. तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच छोटे-मोठे अपघात होत आहेत. तरी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावी, अशी मागणी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
सारसनगर भागातील औसरकर मळ्यातील शेतकऱ्यांच्या मालाची नुकसानाची पाहणी करताना नगरसेवक
प्रकाश भागानगरे. समवेत शेतकरी मिलिंद कानडे, संजय गाडळकर, गणेश कानडे, किरण ओऔसरकर, अनिल गाडळकर, भाऊसाहेब गाडळकर, गुडू खताळ आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post