मनसे कार्यकर्त्यांनी फोडले वीज कंपनीचे कार्यालय..व्हिडिओ

मनसे कार्यकर्त्यांनी फोडले वीज कंपनीचे कार्यालय..व्हिडिओ

नवी मुंबई : लॉकडाउनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. वीज बिल कमी करावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबद्दल राज्य सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे.
नवी मुंबई आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. वाशी सेक्टर 17 मधील महावितरणच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. कार्यालयाच्या काचा आणि फर्निचरची कार्यकर्त्यांनी तोडफोड करून वीज बिल दरवाढीचा निषेध केला आहे.
व्हिडिओ


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post