सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे निर्बंधांसह खुली करण्याचा विचार करावा
जैन समाजाच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची सरकारला सूचना
मुंबई : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. 'कोरोनाच्या साथीमध्ये मोजक्या लोकांना लग्न आणि अंत्यविधीला हजर राहण्याची परवानगी दिली जाते, मग सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळेही काही निर्बंध घालून सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा विचार राज्य सरकारने करावा', अशी सूचना मुंबई हायकोर्टाने केली आहे.
मॉल्स, सलून, वाईन शॉप्स, दुकानं सुरू झाली मग धार्मिक स्थळांवर बंदी का? असा सवाल करत शनिवारपासून सुरू होणाऱ्या पर्युषण काळात जैन मंदिरात जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. भांडुपमधील रहिवासी अंकित वोरा आणि काही जैन ट्रस्टनी मुंबई कोर्टात ही याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर सुनावणी देत 'कोविड-19 सारखी भयंकर महामारी पसरलेली असताना मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी प्रार्थनास्थळं उपयुक्त ठरू शकतात, तेव्हा राज्य सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने याबाबत विचार करुन 13 ऑगस्टपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी', असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
Post a Comment