गणेशमूर्ती स्थापनेसाठी अटीशर्तींवर मंडपांना परवानगी द्यावी

गणेशमूर्ती स्थापनेसाठी अटीशर्तींवर मंडपांना परवानगी द्यावी

आ.संग्राम जगताप यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

गणेशोत्सवाची परंपरा खंडीत होऊ नये, यासाठी अत्यंत साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काही अटी-शर्तींवर गणेश मंडळांना परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन केली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मानाच्या गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असला, तरी मंडपांना परवानगी दिली जाणार नाही, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन चर्चा केली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. गणेश भक्तांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी गणेश मुर्तीची स्थापना करण्यासाठी काही अटी-शर्तींवर परवानगी देण्यात यावी, अशी भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी मांडली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post