लोंढेनगरला भिंतीवर रंगवला चाळीस फुटी तिरंगा
अहमदनगर(प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड येथील लोंढेनगर येथील नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती पध्दतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला. लोंढे निवासमध्ये 15 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात महिला, युवक आणि बालगोपाल फिजीकल डिस्टन्स व तोंडाला मास्क लावून सहभागी झाले होते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व सण, उत्सवांवर गदा आली आहे. त्यामुळे बाहेर न जाता घराच्या छतावर स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. छताच्या भिंतीवर 40 फुटी तिरंगा ध्वज रंगवून त्याला सलामी देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द झालेले असताना लोंढेनगरला घराच्या छतावर पै.संभाजी लोंढे यांच्या संकल्पनेने हा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माधुरी लोंढे, ममता शिंदे, उर्मिला नलगे, रंजना रणनवरे, श्रावणी सुपेकर, ज्योती सुपेकर, मिरा साठे, पुष्पा केळगंद्रे, पूजा परळकर, अनिकेत साठे, शुभम रणनवरे, गौतम लसगरे, जय लसगरे, संजय निशाद, कमल निशाद, दिपक काळे, किरण जरे गोविंद शिंदे आदि उपस्थित होते.

Post a Comment