स्वत:चे जिल्हे लॉकडाऊन करणारे नगरमध्ये आल्यावर लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगतात
खा.डॉ.सुजय विखे यांचा पालकमंत्री, आरोग्यमंत्र्यांवर निशाणा
नगर : करोनाचा वाढता प्रादुर्भाव व लॉकडाऊनच्या मुद्दयावरुन भाजपचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी व प्रशासनावर टिका केली आहे. लोणी येथे दूध दरवाढ आंदोलनावेळी बोलताना खा.विखे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे. नगरमध्ये आल्यावर पालकमंत्री, आरोग्यमंत्री लॉकडाऊनची गरज नाही असे म्हणतात. परंतु, याच मंत्र्यांनी स्वत:चे जिल्हे लॉकडाऊन करण्याची काळजी घेतली आहे, अशा शब्दात त्यांनी टिकास्त्र सोडले.
नगर जिल्ह्यातील करोनास्थितीबाबत चिंता व्यक्त करताना खा.विखे म्हणाले की, नगर जिल्ह्यात करोनाची स्थिती अतिशय गंभीर आहे. राज्य सरकारकडून रॅपिड अँटीजेन टेस्टवर भर दिला जात आहे. मात्र या टेस्टमध्ये त्रुटी आहेत. माझ्या स्वत:च्या विळदमधील हॉस्पिटलमध्ये रॅपिड टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेले आरटीपीसीआर टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जानेवारी फेब्रुवारीच्या तुलनेत नगरमध्ये जुलै ऑगस्टमध्ये मृत्युदर प्रचंड वाढला आहे. या सर्व गोष्टींचा लवकरच पोलखोल करणार आहे. रॅपिड अँटीजेन निगेटिव्ह आलेल्यांची आरटीपीसीआर टेस्ट आवश्यक आहे. नगरमध्ये नियोजनाचा अभाव आहे. एका शिवसेनेच्याच नगरसेवकाने मला एका शववाहिकेत बारा बारा मृतदेह कोंबले जात असल्याची क्लिप पाठवली होती. करोनास्थिती गांभीर्याने घेतली जात नाही, अशी खंत खा.विखे यांनी बोलून दाखवली.

Post a Comment