तनपुरे कारखान्याच्या अध्यक्षपदी नामदेव ढोकणे तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय ढूस

तनपुरे कारखान्याच्या अध्यक्षपदी नामदेव ढोकणे तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय ढूस

राहुरी : राहुरीतील डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नामदेव ढोकणे यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय ढूस यांची निवड झाली आहे. खा.डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. राहुरी कारखान्यावर खा.विखे प्रणित पॅनलची सत्ता असून पहिल्या वर्षी पाटील यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. त्यांच्यासह उपाध्यक्षांनी नुकतेच राजीनामे दिले होते. यापार्श्वभूमीवर नवीन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. यात अध्यक्षपदी ढोकणे यांची तर उपाध्यक्षपदी ढूस यांची निवड करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post