समाजकल्याण सहाय्यक आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल नितीन उबाळे यांचा सत्कार

समाजकल्याण सहाय्यक आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल नितीन उबाळे यांचा सत्कार


 अहमदनगर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे यांची सातारा येथे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती वर बदली झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलच्या वतीने जिल्हा अध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महेश बारगजे , कार्याध्यक्ष बाबा शेख , चंद्रकांत वाघमारे ,  बाळासाहेब गायकवाड , शेखर बोत्रे , राजू पडेकर ,पोकळे मॅडम , आदी उपस्थित होते.  यावेळी सत्काराला उत्तर देताना उबाळे साहेब म्हणाले की , अहमदनगर जिल्ह्यांतील दिव्यांगाच्या शेवटच्या घटका पर्यत त्यांच्या सर्व योजना  पोहचण्यासाठी प्रयत्न केला . तसेच दिव्यांगाचे जिल्हा परिषद मधील प्रश्न सोडविण्यात आले आहे . दिव्यांगाचे ५ % निधीचे वाटप करताना सर्व दिव्यांगाना याचा कसा फायदा होईल याकडे पूर्ण लक्ष दिले . यावेळे रत्नाकर ठाणगे म्हणाले की , पुणे जिल्हा परिषद धर्तीवर दिव्यांगाचा गाव निहाय सर्वे करूण अहमदनगर जिल्ह्यांतील दिव्यांगाना पेंशन चालू करण्यात यावी . यामुळे ही योजना शेवटच्या घटकापर्यत जाईल यासाठी उबाळे साहेब यांनी प्रयत्न करावे असे ठाणगे म्हणाले 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post