साकत येथे साकेश्वर गो- शाळेचे निलेश गायवळ यांचे हस्ते उद्घाटन..VIDEO

साकत येथे  साकेश्वर गो- शाळेचे निलेश गायवळ यांचे हस्ते उद्घाटन

जामखेड (नासिर पठाण)-  गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्म दिवस निमित्त साकत येथील गो-शाळेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले. या गोशाळेत ५५ गाईंचे संगोपन करण्यात येत आहे त्या सर्व गोमातांना चारा व पशुखाद्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
           साकत येथे गेली पाच वर्षापासून गोशाळा आहे परंतू निवारा, चारा व पशुखाद्य नसल्याने गोशाळेत गाईंचे संगोपन करण्यास अनेक अडचणी येत होत्या या सर्व अडचणीवर सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ यांच्या सहकार्याने व श्री शिवप्रतिष्ठानचे तालुकाप्रमुख पांडुरंग भोसले यांच्या पुढाकाराने ५० पत्र्याचे शेड केल्यामुळे कत्तलखान्यात जाणाऱ्या ३५ च्या आसपास गाई व कालवड तसेच शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या २० गाईंचे संगोपन या ठिकाणी करण्यास मदत झाली आहे.
      यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ म्हणाले, गोमाता आपल्या हिंदू धर्मात पुज्य मानली जाते याबाबत पांडुरंग भोसले यांनी गोहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेतला गाईचे संगोपन करायचे असेल तर जागा व निवारा पाहिजे सावरगाव व साकत येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. गाईंचे संगोपन करण्यासाठी आवश्यक शेडसाठी पत्रे देण्याचे ठरवले तो शब्द आज गोकुळाष्टमीच्या निमित्ताने पूर्ण झाला आहे. तसेच यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ यांनी केले.
       पांडुरंग भोसले यांनी सर्व धारकरी यांच्या मदतीने श्री गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतून या गोशाळेचे संगोपन करू निलेश भाऊंनी दिलेले मदत ही मोलाची आहे असे मनोगत व्यक्त केले.हभप. मेहबूब शेख महाराज यांनी सर्व दानशूर व्यक्तींचे आभार व्यक्त करून यापुढेही हातभार लावावा अशी विनंती केली.
       यावेळी साकेश्वर गो शाळेचे व्यवस्थापक अजिनाथ पुलावले महाराज, सौताडा चे ह-भ-प मेहबूब महाराज, नगरसेवक महेश निमोणकर, राष्ट्रवादीचे नेते हनुमंत पाटील, मनसेचे  दादा सरनोबत, सावरगावचे सरपंच काकासाहेब चव्हाण, साकतचे माजी सरपंच कांतीलाल वराट, शिउरचे उपसरपंच विठ्ठल चव्हाण, धारकरी सचिन देशमुख,  जानकीमामा गायकवाड, अँड. हर्षल डोके, प्रतिष्ठित व्यापारी राहुल बेदमुथा, राहुल पवार, किशोर गायवळ, सुनील गुरव, पत्रकार बंधु व सर्व शिवभक्त व शिवप्रतिष्ठानचे धारकरी उपस्थित होते. यावेळी व्यापारी राहूल बेदमुथ्था व शिवूरचे उपसरपंच विठ्ठल चव्हाण यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयाची देणगी जाहीर केली.

VIDEO

       

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post