संपूर्ण शहरांमध्ये प्रभाग निहाय औषध फवारणी ला सुरुवात - महापौर बाबासाहेब वाकळे

संपूर्ण शहरांमध्ये प्रभाग निहाय औषध फवारणी ला सुरुवात - महापौर बाबासाहेब वाकळे


संपूर्ण शहरांमध्ये कोरोणा रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे त्यासाठी उपायोजना म्हणून संपूर्ण शहरांमध्ये 40 लोकांच्या टीम मार्फत औषध फवारणीचे काम महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या आदेशाने आज सुरू करण्यात आले. यावेळी मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, एस आय सुरेश वाघ, अविनाश हंस, मुकादम रंगनाथ भालेराव तसेच महापालिकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
       यावेळी महापौर वाकळे म्हणाले की शहरांमध्ये कोरोणा रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे असा निर्णय घेण्यात आलेला आहे की संपूर्ण शहरांमध्ये औषध फवारणी लवकरात लवकर करून घेण्याची गरज आहे त्यासाठी महापालिकेच्यावतीने 40 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या कर्मचाऱ्यांना मार्फत रोज एक प्रभाग अशा पद्धतीने संपूर्ण नगर शहरात फवारणी करण्यात येणार आहे प्रत्येक प्रभागातील नेमणुकीस असलेले एस आय तसेच केअरटेकर यांच्यावर या प्रभागामध्ये फवारणी करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे तसेच आरोग्य अधिकारी डॉक्टर पैठणकर व मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम काम करणार आहे असे यावेळी महापौर वाकळे यांनी सांगितले.
          यावेळी महापौर वाकळे म्हणाले की 29 जुलै च्या महासभेत उपमहापौर मालन ताई ढोणे, स्थायी समिती सभापती मुदसर शेख,सभाग्रह नेते स्वप्नील शिंदे,महिला बालकल्याण सभापती लताताई शेळके ,विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, भाजप शहराध्यक्ष भैय्या गंधे तसेच सर्व नगरसेवक यांनी मागणी केली होती त्या वेळी फवारणीचा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगाने आज फवारणीचे काम सुरू करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post