नगर गणेश दर्शन 2020- दिल्लीगेटचा शमी गणपती

दिल्लीगेटचा शमी गणपती

नगर - अहमदनगर मधील अष्टविनायक समजल्या जाणाऱ्या गणपती पैकी शमी गणपती एक मनाला जातो. जुन्या कोर्टाकडून दिल्लीगेट कडे जाताना हा गणपती आहे. हा स्वयंभू गणपती समजला जातॊ. या गणपती विषयी आणखी माहिती सांगताना मंदिराचे पुजारी श्री. प्रमोद रेखी म्हणतात साधारण पणे दीडशे वर्षांपूर्वी एक साधू पूजा विधी करत असतांना त्यांना एक दृष्टांत झाला कि जवळच शमीच्या झाडा खाली मोठ्या हौदात माझी गणेश मूर्ती आहे.त्याचा तुम्ही जीर्णोद्धार करावा त्या प्रमाणे भिंगारच्या देशमुखांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शमीच्या झाडा खाली केली. तेव्हापासून या गणपतीची पूजा अर्चा नित्य नेमाने केली जाते. हि मूर्ती स्वयंभू मानली जाते. सन 1944 मध्ये या मंदिराचे ट्रष्ट मध्ये रूपांतर झाले. सन 2003 मध्ये या मूर्तीच्या शिरोभागी भग्नपणा जाणवू लागल्या मुळे त्यावेळी नाशिकचे शांताराम महाराज यांनी त्यावर तांबे पितळेचा वज्रलेप लावण्यास सांगितले. हा वज्रलेप आणि त्यावर मुकुट आजही तसाच आहे. दर माघ महिन्यात या मंदिरात दररोज पाच जोड्या बसवून गणपतीचा अभिषेक केला जातो. दर चतुर्थीला येथे मोठी गर्दी होते. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणून शमी गणपती ओळखला जातो. या मंदिराचे ट्रष्टी श्री रंगनाथ नगरकर तर सेक्रेटरी श्री. विनायक देशमुख आहेत. अशी माहिती श्री. नारायण आव्हाड यांनी दिली
संकलन - प्रा. डॉ संतोष यादव

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post