उपवासाची भगर खाल्याने तब्बल 100 जणांना विषबाधा

उपवासाची भगर खाल्याने तब्बल 100 जणांना विषबाधा

बीड :  उपवासाची भगर खाल्याने तब्बल 100 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे घडली आहे. संबंधितांना उलटी, मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर काही रुग्णांना बीड रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गोकुळाष्टमीला अनेक जण उपवास धरतात. दरम्यान गेवराई तालुक्यातील धोंडराई पासून जवळच असलेल्या तळणेवाडी येथील नागरिकांनी गोकुळाष्टमी उपवासानिमित्त गावातीलच एका किराणा दुकानातून भगर खरेदी केली होती. भगरीचा भात खाल्ल्यानंतर महिला, ग्रामस्थांना मळमळ, उलटी, जुलाब आदी त्रास जाणवू लागला.
सायंकाळी चार नंतर गावातील जवळपास शंभरहून अधिक जणांना अधिकच त्रास जाणवू लागल्याने चांगलीच धांदळ उडाली. त्रास जाणवू लागलेल्या महिला, ग्रामस्थांना वाहनाद्वारे गेवराई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post