अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग
मुंबईः बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोगाचं निदान झालं आहे. त्याचा कर्करोग तिसरा टप्प्यातला असून तो लवकरच अमेरिकेत उपचारांसाठी रवाना होणार असल्याचं कळतंय. अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन यानं संजय दत्तच्या प्रकृतीसंदर्भात ट्विट केलं आहे
काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळं मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची करोना चाचणीही घेण्यात आली होती. मात्र, ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. उपचारांनतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता.
Post a Comment