हरिभाऊ डोळसेंची निवड ही त्यांच्या कार्याची पावती आहे

हरिभाऊ डोळसेंची निवड ही त्यांच्या कार्याची पावती आहे - चंद्रभान आग्रवाल

नगर - महाराष्ट्र राज्य तेली समाज नाशिक विभागाचे कार्याध्यक्षपदी हरिभाऊ डोळसे यांची निवड ही त्यांच्या या पूर्वीच्या कार्याची पावती आहे. ते या पदाला न्याय देऊन नगरचे नाव नाशिक विभागात उंचवतील असे प्रतिपादन आग्रवाल बिसलरी उद्योग समुहाचे संचालक चंद्रभान आगरवाल यांनी केले. नगर बम बम भोले ग्रुप व व्यापारी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.डोळसे यांच्या या नव्या नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री.आग्रवाल  बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक नारायणराव पवळ अण्णा होते.
सेवाभावी वृत्तीने सर्व क्षेत्रात मदत करणारा मित्र म्हणून डोळसे यांचे गुण कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ, ज्ञानेश्‍वरी देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात श्री.पवळ अण्णा म्हणाले, लोकांना पाठबळ देणारा हा माझा 20 वर्षापासूनचा मित्र आहे. घरातील ज्येष्ठांना मान-सन्मान देऊन त्यांची सेवा करणारे हरिभाऊ घराबाहेरही त्यांची सेवा आहे, असे सांगून डॉ.चंद्रकांत केवळ यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर जे नियम आहेत ते प्रत्येकाने पाळावे, असे आवाहन केले तर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष प्रकाश भंडारे म्हणाले, केवळ ज्ञाती समाजापुरते नव्हे तर सर्व क्षेत्रात डोळसे कार्य करतात असे सांगून भंडारे यांनी सध्याच्या परिस्थितीत आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज अग्नीहोत्र करावे, असे आवाहन केले.
मैत्री जपतांना व्यवहारावर पाणी सोडणारा व्यक्ती अशी डोळसे यांची प्रतिमा आहे, असे अ‍ॅड.अनिल कुलाळ यांनी सांगितले. तर विजय गुरव म्हणाले, रेल्वे इंजिन जसे सर्व डबे ओढून योग्यस्थानी पोहचवते तसे हरिभाऊ यांचे नेतृत्व मित्र-परिवारासाठी कार्यरत आहे.
याप्रसंगी सर्वश्री राजेंद्र नारंग, संजय वखारिया, दिलीप गुंदेचा, पारस कांकरिया, कैलास सोनवणे, अर्जुनराव कराळे, राजेंद्र लालबागे, दिलीप धोका, दिलीप गुगळे आदिंची समयोचित भाषणे झाली. प्रारंभी मनोहर खुबचंदानी यांनी स्वागत प्रास्तविक केले. शेवटी अभय गुंदेचा यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post