भंडारदरा धरणाचे दरवाजे उघडले, प्रवरा नदी पात्रात विसर्ग...व्हिडिओ

भंडारदरा धरणाचे दरवाजे उघडले, प्रवरा नदी पात्रात विसर्ग...व्हिडिओ
जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सतकर्ततेचा इशारा

 नगर (विक्रम बनकर)जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणारा पाउस तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून सोडण्यात आलेला विसर्ग यामुळे जिल्ह्यातील धरणांत मोठया प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे भंडारदरा धरणातून प्रवरा नदी पात्रात 3268 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. रविवारी सकाळी भंडारदरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून धरणातील पाणीपातळी 10 हजार 336 दशलक्षघनफूट इतकी आहे, अशी माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ग.भा.नान्नोर, भंडारदरा धरण शाखेचे सहाय्यक अभियंता अभिजीत देशमुख यांनी दिली.याच परिसरातील निळवंडे धरणातही पाण्याची आवक सुरु असून 16 ऑगस्ट रोजी धरणाची पाणीपातळी 640.25 मीटर इतकी होती.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातून नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून होणारी पाण्याची आवक तसेच सिना धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भिमा नदीस दौंड पुल येथे 29 हजार 465 क्सुसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यापार्श्वभूमीवर धरणाच्या पाणीसाठ्यात तसेच नदीपात्रातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रवरा, गोदावरी, भीमा, सिना या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी, ओढे व नाल्या काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची, दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगरपायथ्याशी राहणार्‍या लोकांनी दक्षता घ्यावी. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणार्‍या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. आपत्कालिन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथील दूरध्वनी क्रमांक 1077 (टोल फ्री), 0241-2323844/2356940 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यावतीने करण्यात आले आहे.
व्हिडिओ भंडारदरा...


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post