रोटरी कोविड केअर सेंटरमध्ये दहिहंडीचा उत्साह...व्हिडिओ

रोटरी कोविड केअर सेंटरमध्ये दहिहंडीचा उत्साह...व्हिडिओ
सोशल डिस्टन्सिंग राखत रूग्णांनी लुटला आनंद

नगर- नगरमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरु असलेल्या रोटरी कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी योग प्राणायाम, विविध खेळ याचे आयोजन केले जातात. या केंद्रातील रूग्णांनी गोकुळाष्टमीचा आनंद लुटला. सोशल डिस्टन्सिंग राखत रूग्णांनी दहिहंडीचाही आनंद लुटला. विशेष म्हणजे याठिकाणी दहिहंडी फोडण्याचा मान महिलेला देण्यात आला. करोना महामारीच्या संकटातून समस्त मानवजातीची लवकरच सुटका होईल असा विश्वास व्यक्त करीत सर्वांनी भगवान श्रीकृष्णाला साकडं घातलं. रोटरी क्लबचे अध्यक्ष ऍड.अमित बोरकर यांनी या दहिहंडीचा उत्साह दर्शवणारा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओ-

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post