महसूल व आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांवर विखे पाटील मेमोरियलमध्ये मोफत उपचार : खा.डॉ.सुजय विखे

महसूल व आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांवर विखे पाटील मेमोरियलमध्ये मोफत उपचार : खा.डॉ.सुजय विखे

नगर : केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेअंतर्गत क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत यापूर्वी शेवगाव, जामखेड, पाथर्डी तालुक्यांसाठी निधी उपलब्ध झाला असून या योजनेअंतर्गत ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल. देशामध्ये केवळ अहमदनगर जिल्ह्यासाठी  तीन तालुक्यांची निवड केंद्र सरकारने केली. यातून फेज 2 साठी श्रीगोंदा, नगर, आणि पारनेर या तालुक्यांचा देखील या योजनेमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करणार असून या योजनांमध्ये या तालुक्यांचा समावेश लवकरच होईल असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  राष्ट्रीय महामार्ग क्र 160 नगर-दौंड-  बीड व अन्य विषयासंदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते ,आणासाहेब शेलार, सिद्धेश्वर देशमुख,बाळासाहेब गिरमकर, प स सदस्य जिजाबापू शिंदे, प्रतिभा झिटे,भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप नागवडे,गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ खामकर, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अधिकारी जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलतांना खासदार डॉ. विखे पाटील म्हणले की, श्रीगोंदा तालुक्याचे हद्दीतून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनबाबत व त्याच्या भूसंपादन रकमेच्या बाबत आढावा घेउन  लवकर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले. श्रीगोंदा कोरोनाबाबत आढाव घेताना खा, डॉ विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान सहाय्यता निधीतून अहमदनगर जिल्ह्यासाठी मिळणार्‍या रुग्णवाहिका मधून प्रत्येक तालुक्याला दोन रुग्णवाहिका देण्याचे सुद्धा जाहीर केले. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र काम करणारे  महसूल व आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांना कुठे जाण्याची आवश्यकता नसून डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये या सर्व कर्मचार्‍यांवर मोफत उपचार करणार असल्याचे सुद्धा डॉक्टर विखे यावेळी बोलताना म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post