राज्याला केंद्राकडून मिळणारा टेस्ट किट, पीपीई, मास्कचा पुरवठा बंद


राज्याला केंद्राकडून मिळणारा टेस्ट किट, पीपीई, मास्कचा पुरवठा बंद
आ.रोहित पवार यांची केंद्र सरकारवर टिका

नगर : केंद्र सरकारने राज्याला करण्यात येणारा आरटीपीसीआर किट, पीपीई तसेच एन 95 मास्कचा पुरवठा थांबविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्राच्या या धोरणावर आ.रोहित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. एकीकडे जीएसटीचेही हक्काचे पैसे थकवायचे आणि कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा तसेच दुसरीकडे करोना सुरक्षा साधनांचा पुरवठा थांबवून जबाबदारीतून पळ काढायचा प्रकार केंद्र सरकार करीत असल्याची टिका आ.पवार यांनी केली आहे. आ.पवार यांनी म्हटले आहे की, आरटीपीसीआर टेस्ट किट,पीपीई व एन 95 मास्कचा पुरवठा थांबवण्याचा केंद्राचा निर्णय राज्याला आणखी संकटात ढकलणारा आहे.आधी हक्काचे जीएसटीचे पैसे थकवायचे,नंतर कर्ज घ्यायला सांगायचं व आता कोरोना सुरक्षा साधनांचा पुरवठाही थांबवायचा,याला जबाबदारी घेणं म्हणत नाहीत.या निर्णयाचा पुनर्विचार करावा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post