सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, ‘सत्यमेव जयते’ पार्थ पवारांची प्रतिक्रिया
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी अवघ्या दोन शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' एवढंच पण सूचक ट्वीट केलं आहे.
पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या बोलण्याला कवडचीही किंमत देत नाही, अशा शब्दात फटकारलं होतं. त्यानंतर आता पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्वीट केलं आहे.
Post a Comment