अहमदनगर बर्न सेंटरच्यावतीने कोविड सेंटर सुरु

अहमदनगर बर्न सेंटरच्यावतीने कोविड सेंटर सुरु
 मानवतेच्या भावनेतून कोरोना रुग्णांची सेवा करावी - आ. संग्राम जगताप

नगर : प्रत्येकाने मानवतेच्या भावनेतून कोरोना रुग्णांची सेवा करावी. कोरोना संसर्ग विषाणू असल्यामुळे नागरिकांत मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या रोगाला थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या आरोग्याची तपासणी करुन उपचार घ्यावे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नियमांचे व अटींचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रत्येकाने मास्क वापरणे, सोशल  डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचे वापर करणे आवश्यक आहे. शहरामध्ये विविध सामाजिक संस्थांनी पुढे येऊन कोविड सेंटर सुरु केले आहे. लक्षण असणाऱ्यांसाठी अहमदनगर बर्न सेंटरच्यावतीने अत्याधुनिक साहित्याच्या सहाय्याने ऑक्सिजन, व्हेंटिलीटरचे १५ बेड असलेल्या सेंटरची व्यवस्था केली आहे. याची खरी गरज जाणवत होती, ती अहमदनगर बर्न सेंटरने पूर्ण केली आहे.असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
स्टेशन रोडवरील अहमदनगर बर्न सेंटरच्यावतीने लक्षणं असणाऱ्यांसाठी १५ बेटचे कोविड सेंटरचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. भास्कर जाधव, डॉ. अतुल खालकर, डॉ. सतीश राजूकर, डॉ. सागर झावरे, डॉ. शितल परहर, डॉ. दीपक नजन, डॉ. अक्षयदीप झावरे पाटील, डॉ. अशोक शिंदे, डॉ. सचिन टेकाडे, डॉ. राहुल गाडेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post