नेवासा तालुक्यामध्ये पुन्हा आढळेल २७ कोरोनाचे रुग्ण

नेवासा तालुक्यामध्ये पुन्हा आढळेल २७ कोरोनाचे रुग्ण

नेवासा : तालुक्यातील विविध भागात कोरोनाचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत चालला असून रविवारी पुन्हा २७ कोरोना बाधीत रुग्णांची यात भर पडली असल्याने रुग्ण संख्या ७४१वर गेली आहे.रविवारी नेवासा येथील कोविड केअर सेंटरला ६० व्यक्तींच्या घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये २१ व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे.
यामध्ये नेवासा शहर ०४,सोनई ०४,घोडेगाव ०३,मुकींदपूर ०२,म्हसले ०२ तर खेडले परमानंद, तामसवाडी,नेवासा बुद्रुक,शिरेगाव,धनगरवाडी, वडाळा या गावांमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.तर खाजगी लॅब मधून प्राप्त झालेल्या अहवालात सहा कोरोना बाधीत आढळून आले असून यामध्ये वंजारवाडी ०३,बेल्हेकरवाडी, देवगाव,भेंडा बुद्रुक येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
तसेच आज १३ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने ५८२ व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे.तालुक्यात आजपर्यंत १४ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post