नगरमध्ये दूध दरवाढीच्या मागणीसाठी मोर्चा...व्हिडिओ


नगरमध्ये दूध दरवाढीच्या मागणीसाठी मोर्चा...व्हिडिओ
माजी खा.राजू शेट्टी केंद्र व राज्य सरकारवर बरसले

नगर : दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लॉकडाऊनची सर्व बंधने झुगारुन देत नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पुणे औरंगाबाद महामार्गावरुन मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. परंतु, पोलिसांनी त्याआधीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणारे रस्ते बंद केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रस्त्यातच थांबून आंदोलन केले. यावेळी माजी खा.राजू शेट्टी यांनी दूधाच्या प्रश्नावरुन केंद्र व राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले.
तत्पूर्वी नगरमध्येच पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असताना तसेच करोनामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असताना एका अभिनेत्याच्या आत्महत्येची अधिक चर्चा केली जात असल्याने खंत व्यक्त केली. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास योग्य होवून त्याला न्याय मिळालाच पाहिजे, परंतु, इतकीच संवेदनशीलता सरकार तसेच सर्वच पक्षांनी शेतकर्‍यांबाबतही दाखवली पाहिजे होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपच्या दूध आंदोलनावर भाष्य करताना शेट्टी म्हणाले की, शेतकर्‍यांसाठी कोणी आंदोलन करीत असेल तर त्याचे स्वागतच आहे. परंतु, दूधाचा प्रश्न हा राज्य सरकारबरोबरच केंद्राशीही निगडीत आहे. आंदोलन करणारांनी केंद्राच्या भूमिकेबाबतही बोलणे गरजेचे आहे.
व्हिडिओ


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post