स्थानिक गुन्हे शाखेतील रविंद्र कर्डिले विरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे शाखेतील रविंद्र कर्डिले विरुद्ध लाच प्रकरणी गुन्हा दाखल
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई 

नगर -  तक्रारदार यांचे अहमदनगर येथील मोटरसायकल दुरुस्ती दुकानावर पत्ते खेळण्यावरुन क्लबची केस न करणेसाठी  व फिर्यादीच्या वडिलांवर झालेल्या केसमध्ये   आरोपी न करण्यासाठी  20 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील रविंद्र कर्डिले विरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत तक्रारदार यांच्या तक्रारीवरून नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.  आरोपी कर्डिले  यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकड़े रु 20000/-  लाच मागितली. श्री सुनिल कडासने सो, पो अधीक्षक, ला प्र वि नाशिक,  निलेश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक,  ला प्र वि.नाशिक  यांच्या मार्गदर्शनाखाली    पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे, पोहेका सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील,सुनील गिते, चालक शिंपी यांच्या पथकाने ही कारवाई केली.         

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक
*@ दुरध्वनी क्रं.    0253-2578230*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post