सागाच्या लाकडाची छोटी बैलगाडी

लॉकडाऊनमध्ये साकारली सागाच्या लाकडाची छोटी बैलगाडी
कर्जतच्या रणजित थोरात याची थक्क करणारी कलाकारी

नगर : लॉकडाऊनमुळे कलाक्षेत्रातील मंडळींची बरीचशी अडचण झालेली आहे. मात्र तरीही काही हरहुन्नरी कलाकार या काळात आपल्या कलेने लक्ष वेधून घेतात. नगरच्या चिंतामणी आर्ट गॅलरीत कार्यरत असलेला कर्जत येथील रणजित अनिल थोरात या कलाकाराने लॉकडाऊनच्या काम नसल्याच्या काळात शांत न बसता लाकडी बैलगाडीच्या रुपाने अनोखी कलाकृती साकारली आहे. सागाच्या लाकडापासून त्याने वडील अनिल थोरात व चुलते भारत थोरात यांच्या सहकार्याने बैलगाडीची हुबेहुब छोटी प्रतिकृती साकारली आहे. या बैलगाडीची लांबी 3 फूट तर रुंदी 2 फूट आहे. उंची 20 इंच आहे. दोन महिने झटून त्याने ही बैलगाडी साकारली असून ही छोटी बैलगाडी पाहण्यासाठी त्याच्या घरी अनेक जण येत आहेत. बैलगाडी व ती चालवणारा गाडीवान असलेली ही कलाकृती सर्वांनाच खूप भावली आहे. यासाठी त्याला तब्बल 30 हजार रुपये खर्च आला. अनेकांनी ही गाडी त्याच्याकडे विकत मागितली असून त्यासाठी दाम मोजण्याचा तयारीही अनेकांनी दर्शवली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post