कंटेनरमधील मोबाईल, रोकड चोरणारे मुकुंदनगरमधील दोघे गजाआड

कंटेनरमधील मोबाईल, रोकड चोरणारे मुकुंदनगरमधील दोघे गजाआड

अहमदनगर : रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरमधील मोबाईल, रोख रक्कम तसेच क्रिएटा कारची चावी चोरणार्‍या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दि.22 ऑगस्ट रोजी रोमान चाहत खान (रा.नगिना, हरियाणा) या कंटेनरचालकाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात हद्दीत कंटेनर उभा केलेला होता. त्यावेळी चोरट्यांनी कंटेनरमधील दोन मोबाईल, रोख रक्कम आणि के्रटा कारची चावी चोरुन नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
स्थानिक गुन्हे शाखेने पो.नि.दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करून आरोपींची माहिती मिळवली. त्यानुसार जावेद लियाकत शेख (वय 30, रा.मुकुंदनगर, नगर) व अझरुद्दीन मेहबूब शेख (वय 30, रा.मुकुंदनगर, नगर) या चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोबाईल, दोन क्रेटा कारच्या चाव्या हस्तगत करण्यात आल्या. आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोहेकॉ दत्ता गव्हाणे, मनोज गोसावी, सचिन आडबल, रवीकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, रणजित जाधव, शिवाजी ढाकणे यांनी सहभाग घेतला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post