संपूर्ण शहरामध्ये लक्षण असणाऱ्यांची अँटीजेन तपासणी - महापौर बाबासाहेब वाकळे

संपूर्ण शहरामध्ये लक्षण असणाऱ्यांची अँटीजेन तपासणी - महापौर बाबासाहेब वाकळे

नगर : कोरोना संसर्गाचे रुग्ण शहरात मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरु केल्यामुळे दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी अहमदनगर महापालिका व भारतीय जेन संघटनेच्यावतीने अँटीजेनीक तपासणी सुरु केली आहे. जे रुग्ण सापडणार आहेत, त्यांच्यावर तातडीने उपचार केले जाणार आहे. आमच्या दृष्टीने नगरकरांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. यासाठी आम्ही सर्वजण प्रत्येक क्षण सतर्कतेचा ठेवून उपाययोजना करत आहे. संपूर्ण शहरामध्ये लक्षण असणाऱ्यांची अँटीजेनीक तपासणी केली जाणार आहे. केडगाव परिसरातील देवीरोड येथे नागरिकांची तपासणी सुरु आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व भागामध्ये ही तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर संपूर्ण शहरामध्ये ४0 लोकांच्या टीम मार्फत औषध फवारणीचे कामही सुरु केले आहे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

अहमदनगर महापालिका व भारतीय जेन संघटनेच्यावतीने केडगावच्या नागरिकांसाठी देवी परिसरात अँटीजेनीक तपासणी केंद्राची पाहणी करताना महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, महिला बाल कल्याण समितीचे सभापती लताताई शेळके, उपआयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, डॉ. गिरीष दळवी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आयुक्त मायकलवार म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने कोरोना संसर्ग विषाणूचे लक्षणे आढळल्यास तपासणी करुन उपचार घ्यावेत. कोरोना संसर्ग विषाणूला हद्द पार करण्यासाठी नियम व अटींचे पालन प्रत्येकाने करण्याचे गरज आहे. यामध्ये मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचे वापर करणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात अँटीजेनीक तपासणी शहरात सुरु केली आहे, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post