जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील रिक्त पदे भरणार?


जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील रिक्त पदे भरावीत
जि.प.पदाधिकार्यांची आढावा बैठकीत पालकमंत्र्यांकडे मागणी

नगर : जिल्हा परिषदेच्या अडचणींबाबत व विकास कामासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतली.   सदर बैठकीमध्ये जिल्ह्यामधील सध्या सुरू असलेल्या  कोरोना या आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय योजना संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथील मोठ्या प्रमाणात असणारे रिक्त पदे तातडीने भरणे बाबत कार्यवाही करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या इमारती च्या आरोग्य  सुविधा बाबत अडचणी बाबत चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या ॲम्बुलन्स वाहन चालका अभावी उभ्या आहेत.  पगार, वाहन दुरुस्ती इत्यादीबाबत असणाऱ्या अडचणी पालकमंत्र्यांचे समोर मांडण्यात आल्या. तसेच अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांना आरोग्य सेवा तातडीने उपलब्ध होण्यासाठी 108 क्रमांकांचे वाहने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे बाबत मागणी करण्यात आली.ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक शाळेसाठी नवीन वर्गखोल्या व दुरुस्तीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्यामुळे काम करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने हा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करण्यात आली.ग्रामीण भागात रस्ते दुरुस्तीसाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात ती ३०५४ लेखाशिर्ष अंतर्गत भरीव निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पालकमंत्री  मुश्रीफ यांनी अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अडीअडचणी बाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या बरोबर दूरध्वनी द्वारे चर्चा करून  आरोग्य विभागाच्या अडीअडचणी बाबत मंत्रालय स्तारवर बैठक घेण्याचे मान्य केले. 
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील,  विधानसभेचे सदस्य आमदार रोहित पवार,आमदार संग्राम जगताप, आमदार डॉक्टर किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष  प्रतापराव शेळके, बांधकाम समितीचे सभापती  काशिनाथ दाते, काँग्रेस पक्षाचे गटनेते अजय फटांगरे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भोर  व जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते.








0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post