शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बापू तांबे कायम

*शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बापू तांबे कायम, राज्य संघाच्या कार्यकारी मंडळाचे पत्र*


*झालेल्या तालुका कार्यकारण्या कायदेशीर*

अहमदनगर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अहमदनगर जिल्हयाचे प्रभारी अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांची नियुक्ती कायम असून त्यांनी नजिकच्या काळामध्ये उर्वरीत तालुका कार्यकारिणी निवडून जिल्हा संघाची निवड राज्य कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घ्यावी असे आदेश राज्य संघाच्या कार्यकारी मंडळाने दिले असून राज्य संघाने यापूर्वी चार जुलै आणि बारा ऑगस्ट रोजी दिलेले घटनाबाह्य पत्रे रद्द करण्यात आली असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस संदीप मोटे व कार्याध्यक्ष किसन वराट यांनी दिली .

नगर जिल्ह्यातील एका नेत्याच्या आग्रहास्तव राज्य संघाचे नेते संभाजीराव थोरात व राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांभारे यांनी चार जुलै रोजी जिल्हाध्यक्ष पदावरून बापू तांबे यांना दूर केल्याचे पत्र दिले होते . त्यांच्या जागेवर शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र गेले महिनाभर  ठुबे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा स्वीकार केला नाही . याच काळात बापूसाहेब तांबे यांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांच्या कार्यकारिणी निवडी केल्याने पुन्हा 12 ऑगस्ट रोजी राज्य संघाने पत्र काढून जिल्हा संघटना बरखास्त केल्याचे सांगितले होते . या घटनेवरून नगर जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता . तसेच राज्य संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा बेबनाव दिसून आला . मुळातच राज्य संघाच्या घटनेनुसार जिल्हाध्यक्षाला असे परस्पर काढता येत नाही त्यासाठी राज्य संघाची महामंडळ सभा घ्यावी लागते . परंतु बापू तांबे यांना बाजूला करताना सर्व गोष्टी घटनाबाह्य झाल्याने राज्य संघाच्या कार्यकारी मंडळाने एकमताने निर्णय घेऊन बापूसाहेब तांबे यांचे प्रभारी अध्यक्ष पद कायम ठेवून त्यांनी जिल्ह्यातील उर्वरित तालुक्याच्या निवडी करून घ्याव्यात तसेच कोवीड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीमध्ये जिल्हा संघाचे अधिवेशन घेऊन जिल्हा कार्यकारिणीची निवड करावी असे पत्र राज्य संघाचे कार्यकारी अध्यक्ष एन वाय पाटील, राज्य संपर्क प्रमुख मोहन भोसले, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस आप्पासाहेब कुल, कोषाध्यक्ष जनार्दन नेऊंगरे या पाचही जणांच्या संयुक्त स्वाक्षरीने बापू तांबे यांना देण्यात आले असल्याची माहिती कार्यालयीन चिटणीस साहेबराव अनाप व कोषाध्यक्ष रामेश्वर चोपडे यांनी दिली .

अहमदनगर जिल्हा हा संघाचा बालेकिल्ला असून जिल्हा संघाच्या कार्यकारणी बाबत राज्य संघाने धरसोडीचे धोरण घेतल्याने राज्य संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्याबद्दल संपूर्ण राज्यामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील शिलेदारांच्या भावना लक्षात न घेता एका ठराविक व्यक्तीच्या हातचे बाहुले बनवून राज्य संघ अशाप्रकारे निर्णय घेत असल्यामुळे राज्य संघाच्या कार्यकारी मंडळाने देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . सदरचे सर्व काम हे घटनाबाह्य होत असल्याने व राज्य संघाचे काम हे घटनेनुसार चालत असल्याने बापूसाहेब तांबे यांची केलेली गच्छंती ही बेकायदेशीर असून यापूर्वी राज्य संघाचे अध्यक्ष यांनी दिलेली पत्रे रद्द केल्याने अहमदनगर जिल्ह्या वरून राज्य संघातही दोन गट पडल्याचे दिसून येत आहे . बापूसाहेब तांबे यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये राज्य संघ बळकट करण्याचे काम केले . राज्याच्या पदावर काम करणाऱ्या जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या इशार्‍यावर राज्य संघ नाचत आहे याचे कोडे जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकांना सुद्धा पडलेले आहे . दरम्यान राज्याच्या कार्यकारी मंडळाने अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक संघाची सर्व पार्श्वभूमी समजावून घेऊन बापू तांबे यांची नियुक्ती कायम ठेवून त्यांना उर्वरित तालुक्यांच्या निवडी त्वरित करून घेण्याचे या पत्रान्वये आदेशित केल्याने जिल्ह्यातील संघ प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे . लवकरच जिल्हा संघाचे अधिवेशन घेऊन नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे सरचिटणीस संदीप मोटे, उत्तर जिल्हा प्रमुख राजकुमार साळवे,दक्षिण जिल्हा प्रमुख संतोष दुसुंगे,महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्युलत्ता आढाव,अंजली मुळे,संगिता कुरकुटे,मोहनराव पागिरे,शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष सलीम पठाण, चेअरमन शरद सुद्रीक, व्हा.चेअरमन अर्जुन शिरसाठ,कार्याध्यक्ष किसन वराट,कोषाध्यक्ष  रामेश्वर चोपडे, मंडळाचे कार्याध्यक्ष  बाळासाहेब सरोदे,पदवीधर अध्यक्ष रघुनाथ झावरे,बाळासाहेब सालके, मंडळ सरचिटणीस विठ्ठल फुंदे,बाळासाहेब तापकीर, सुरेश निवडूंगे,भाऊराव राहिंज, राम वाकचौरे, राजेंद्र सद्गीर ,मनोज सोनवणे, रमेश गोरे,आर.टी. साबळे आदींनी दिली .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post