पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत - सत्यजीत तांबे

पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत -  सत्यजीत तांबे


मुंबई- करोनाचे संकट येण्याअगोदरच नोटबंदीसारख्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यात आता लॉकडाऊनमुळे ज्यांना रोजगार होता अश्या 12 करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे. अर्थव्यवस्था आणि लोकांच्या एकूणच जगण्यावर झालेले हे दुष्परिणाम 2-4 वर्षांपूरते मर्यादित नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते भोगावे लागणार आहेत. अर्थव्यवस्था हाताळण्यात केलेल्या या चुकांसाठी पुढच्या १०० पिढ्या मोदींना माफ करणार नाहीत, या शब्दात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
सत्यजीत तांबेंच्या संकल्पनेतून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने घेतलेल्या, ‘कहां गये वो 20 लाख करोड?’ या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी बेरोजगार युवकांशी संवाद साधत त्यांना 20 लाख कोटींच्या पॅकेजची काय मदत मिळाली हे जाणून घेतले. जिल्हा व तालुका पातळीवर बेरोजगार युवकांशी साधलेल्या संवादातून रोजगाराची गंभीर स्थिती समोर आली आहे. गेलेल्या नोकऱ्या परत मिळत नाहीत. लॉकडाउन संपला तरी खर्चाला कात्री लावण्यासाठी कंपन्या कामावरून काढत आहेत. जगायचं कसं हा प्रश्न आहे, अशी निराशा युवकांनी व्यक्त केली. तर "पैसे जाऊ द्या, मोदी म्हणतात नोव्हेंबरपर्यंत ८० करोड लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. आमच्या गावात तर कुणालाच नाही भेटली ही मदत" अशी सद्यस्थिती असल्याचे काहींनी सांगितले. मोदींनी घोषित केलेल्या 20 लाख करोडच्या पॅकेजबद्दल तरुणांमध्ये नाराजी आणि मोदींनी भ्रमनिरास केल्याचे प्रकर्षाने जाणवले.
उद्या युवक काँग्रेसचे पदाधिकारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्यांनाच ‘कहां गये वो 20 लाख करोड?’ हा जाब विचारणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post