मराठमोळ्या उखाण्यातुन करोना जनजागृती...सोशल व्हायरलला नेटकर्यांची दाद

करोना जागृती करणारे मराठमोळे उखाणे


नगर - करोनाकाळात सोशल मिडियावर अनेकांच्या प्रतिभेला लकाकी आली आहे.  प्रत्येकाच्याच जीवनावर परिणाम करणार्या करोनापासून वाचण्यासाठी अनेक कल्पक मेसेज व्हायरल होतात. आता काहींनी मराठमोळ्या पारंपरिक उखाण्यांमधूनही करोना विषयक जनजागृती केली आहे. हे वेगळे उखाणे मनोरंजन करतानाच जागृतीही करणारे आहेत.

करोना उखाणे

हंड्यावर हंडे सात,त्यावर मांडली परात,
कोरोनाला हरवायला,बसा आपापल्या घरात*

मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर
सगळ्यानी मास्क घालूनच पडा घराबाहेर

शंकराच्या पिंडीवर बेलाच पान ठेवते वाकून,
रोजचे व्यवहार करा सोशलडिस्टंसिंग राखून

शिरा बनवायला तूप,साखर,वेलची व रवा आणला जाडा,
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा

ताजमहल,कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,
लक्षण दिसली कोरोनाची तर डॉक्टरना भेटा थेट

काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,
कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले

चिमणीला म्हणतात चिऊ,कावळ्याला म्हणतात काऊ, 
आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ

चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,
डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post