लघुलेखन, संगणक टायपिंग संस्थांना शासनाने आर्थिक मदत करावी

लघुलेखन, संगणक टायपिंग संस्थांना शासनाने आर्थिक मदत करावी 
संस्था संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन

अहमदनगर: करोनाच्या वाढत्या  संसर्गामुळे महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार १६ मार्च २०२० पासून राज्यातील
अंदाजे ४२५० शासनमान्य टंकलेखन, संगणकीय टंकलेखन व लघुलेखन संस्था बंद आवेत. या बंदमुळे या
संस्थाचालकांवर उपासमारीची वेळ तर आली आहेच. शिवाय या संस्था आता कधी सुरु होतील याचा अंदाजही बांधता येत
नाही. संस्था चालू नसल्याने विद्यार्थी येत नाहीत आणि विश्याधी घेत नाही म्हणून संस्थाचालकांना त्यांच्याकडून की
आकारता येत नाही. विद्यार्थ्यांकडून मिळणारे प्रशिक्षण शुल्काच्या आधारावरच या संस्थाचालकांचा उदरनिर्वाह चालत
असतो. आताची कठीण परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने या संस्थांनाआर्थिक मदत करावी, अशी मागणी लघुलेखन, संगणक टायपिंग संस्था संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दर सहा महिन्याला कोटयावधीचा महसूल मिळवून देणा-या व प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविणा-या या उद्योगाला ना
शासनाकडून अनुदान मिळते ना कुठले पाठबळ. त्यामुळे या संस्थाचालकांची परिस्थिती ना घर का ना घाट का अशी
झालेली आहे, अशी खंत अनेक संस्थाचालकांनी व्यक्त केली आहे.त्याची दखल घेतली नाही तर संस्थाचालकांची
उपासमार अटळ आहे.  मार्चपासून संस्था बंद असल्याने आता  तग धरता येत नसल्याचे अनेक संस्थाचालक सांगत आहेत.
 बंद असतानाही संस्थेचे जागेचे भाडे, लाईट बिल, कर्जाचे हप्ते, कर्ज, इतर खर्चाचा बोजा सांभाळून घर कसे चालवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहेच., त्यातच जानेवारी ते जुलै हे सत्र बुडाले आहे.
 शासनाला कोटयावधी रुपयांचा महसूल देणा-या संस्थाचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. शासनाने जुलै सत्रास किमान २५ विद्यार्थी असणा-या संस्थेस रु. २५००० व त्यापुढील विद्यार्थी असणा-या संस्थांना प्रत्येकी रु. १०००० ची मदत करावी अशी मागणी  करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post