टंकलेखन,लघुलेखन, संगणक टायपिंग संस्थांना प्रवेश प्रक्रिया व प्रशिक्षण सुरु करण्याची परवानगी मिळावी
संस्था संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे यांचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन
अहमदनगर- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्यावतीने घेण्यात येणार्या शासनमान्य टंकलेखन, लघुलेखन व संगणक टंकलेखन अभ्यासक्रमाची परीक्षा सत्र डिसेंबर / जानेवारीत होत असते. त्यानुसार या परीक्षांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करून प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरु करण्याची परवानगी मिळावी. सोशल डिस्टन्सींग व इतर उपाययोजना करून संस्था प्रशिक्षण वर्ग सुरु करतील. त्यादृष्टीने आवश्यक आदेश जारी करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य टंकलेखन- लघुलेखन, संगणक टायपिंग शासनमान्य संस्था संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रकाश कराळे यांनी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात कराळे यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन कालावधीत राज्यातील सर्व शासनमान्य टंकलेखन व संगणक टंकलेखन संस्था परीक्षा परिषदेच्या आदेशान्वये बंद ठेवण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनाने शिक्षण संस्थांना त्यांचे कार्यालयीन कामे, प्रवेश प्रक्रिया व मुल्यमापन इ. कारणास्तव कामकाज करण्यास मुभा दिली असून राज्यातील सर्वच शिक्षण संस्था व शासनमान्य टंकलेखन, संगणक टंकलेखन संस्था उघडण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रभाव लवकर संपणार नसल्याने उपाययोजना करुन विना अनुदानीत
असणा-या शासनमान्य टंकलेखन, संगणक टंकलेखन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण हे ऑनलाईन देणे शक्य नाही. तसेच अशा संस्थांत प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक अर्हता ८ वी पास असली तरी १२ वी उत्तीर्ण व पदवी प्राप्त झालेले विद्यार्थी प्रशिक्षण घेत असतात. त्यामुळे मास्क लावणे, सॅनेटायझर वापरणे व सोशल डिस्टींग पाळणे शक्य होणार आहे.
त्याचबरोबर संस्थेमध्ये फक्त ४५ मिनिट व १ तासाचे प्रशिक्षण असल्याने कोरोना बाबत उपाय योजना केल्या
जाणार आहेत. सद्य स्थितीत हा कालावधी टंकलेखन, लघुलेखन व संगणक टंकलेखन अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा असल्याने सुधारीत नियमावली १९९१ अटी व शर्ती नुसार प्रवेश प्रक्रिया सुरु होणे गरजेचे
आहे. तदनंतर प्रत्यक्षात विद्यार्थ्ना प्रशिक्षण सुरु केले जाईल.या कामी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने डिसेंबर २०२० / जानेवारी २०२१ सत्राचे प्रवेश प्रक्रिया सुरु करणेबाबतचे आदेश मंत्रालयीन स्तरावरुन देण्यात यावे, अशी मागणी कराळे यांनी केली आहे.
Post a Comment