रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी टेस्ट कमी होत आहेत

रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी टेस्ट कमी होत आहेत
 प्रशासन व डॉक्टरांवर दबाव टाकण्याचे काम, माजी मंत्री राम शिंदे यांचा गंभीर आरोप

कर्जत (आशिष बोरा ):- प्रशासनावर व डॉक्टरांवर दबाव आणून त्यांना योग्य पद्धतीने काम करू दिले जात नाही. त्यामुळेच तालुक्यात कोरोनाच्या टेस्ट कमी करून कोरोना कमी झाल्याचे भासविण्यात येत असल्याचा व जनतेच्या आरोग्याशी खेळण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आहे. आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांनी  टोला लगावला आहे.
                      भाजपाचे  प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी दादा पाटील महाविद्यालयाच्या वस्तीगृहात उभारलेल्या कोव्हिड केअर सेंटरला अचानक भेट दिली व येथील रुग्णांबरोबर सुरक्षित अंतर ठेवत चर्चा केली. येथील व्यवस्थेबाबत माहिती घेतली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पुंड व आरोग्य विभागाचे कर्मचारी, सुनील यादव उपस्थित होते. या भेटीनंतर माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की,   कर्जत तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असताना ज्यांना आरोग्याबाबत काही ज्ञान नाही त्यांनी या विषयावर बोलू नये. अन्यथा ते लोकांच्या जीवनाशी खेळल्या सारखेच होते. सातत्याने टेस्ट झाल्या पाहिजेत पण सतत टेस्ट कमी केल्या जातात अशा तक्रारी येत आहेत. लोकांना या आजारात लवकर निदान होऊन लवकर उपचार मिळाले तर ते लवकर बरेही होतात. सर्वत्र महाराष्ट्रात, देशात व जगात अशी पद्धत अवलंबली जात आहे. कोरोना सारख्या महामारीच्या विषयात ज्यांना कोणाला याचे ज्ञान नाही अशा व्यक्तींनी डॉक्टर वरती प्रशासनावरती दबाव न आणता जर काम केले तर यातून आपल्याला लवकर मुक्ती मिळू शकेल.

        कोरोना हा गंभीर आजार असून दोन-चार दिवस कोरोणाची रुग्णसंख्या तालुक्यात अत्यंत कमी झाल्याचे पहावयास मिळाले होते. मात्र  हीच संख्या पुन्हा वाढताना दिसत असून यामागील षडयंत्र उघड होण्याची गरज आहे. रुग्णसंख्या वाढल्यास त्याचा ताण आरोग्य व्यवस्थेवर येणार असून सध्या  गंभीर आजाराच्या रुग्णांना नगर सारख्या ठिकाणी बेड लवकर उपलब्ध होत नाहीत.  त्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतते आहे. त्यामुळे या काळात कोरोना सारख्या गंभीर आजारा ला तेवढ्याच उत्तम नियोजनाने तोंड देणे आवश्यक असताना मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही असेच पहावयासच मिळत असून प्रशासनाने याकडे जबाबदारीनेे लक्ष द्यावे असे आवाहन प्राध्यापक शिंदेे यांनी केले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post