करोना योद्धा सन्मानावरून अनेकांची नाराजी


कर्जतमध्ये करोना योद्धा सन्मानावरून अनेकांची नाराजी
शासकीय ध्वजारोहण  कार्यक्रमाच्या वेळेवरही आक्षेपकर्जत (आशिष बोरा ):- कर्जत येथे स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणासह तालुक्यातील विविध ठिकाणी ध्वजारोहण अत्यंत उत्साहात संपन्न झाले. यावेळी तंबाखूविरोधी शपथ उपस्थित सर्वांना देण्यात आली. तर काही व्यक्तींना कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले.
              कर्जत येथे स्वातंत्र्यदिनाच्या त्र्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमता मुख्य रस्त्यावरील शहीद स्मारकाचे पूजन करण्यात आले. प्रांताधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, तहसीलदार नानासाहेब आगळे,पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, भीमाशंकर जंगम यांच्या उपस्थितीत हे पूजन संपन्न झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी मुख्य ध्वजारोहणासाठी तहसील कार्यालयाकडे प्रयाण केले. कर्जत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या  हस्ते प्रथमता ध्वज स्तंभाचे पूजन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक संजय शिरसाठ यांनी आपल्या खड्या आवाजात सलामीचा आदेश दिल्यानंतर राष्ट्रगीत गायन झाले. नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी उपस्थित सर्वांना तंबाखूविरोधी शपथ दिली. आरोग्य विभाग, तहसील कार्यालय,नगर पंचायत, उपजिल्हा रुग्णालय, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कोरोना योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी  उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,विभागीय कृषी अधिकरी गवांंदे, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, तालुका आरोग्य अधीकारी डॉ संदीप पुंड, आदी सह तालुक्यातील अनेक अधिकारी पदाधिकारी, शासकीय कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्या निमित्त अनेकांनी आमचा प्रतिनिधी यामध्ये का घेतला नाही असा प्रश्न उपस्थित केला असून शिक्षक संघटनां, शिक्षकेत्तर संघटनाच्या पदाधिकार्यानी  अधिकाऱ्याची भेट घेऊन नाराजीही व्यक्त केली.


 ध्वजारोहण कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन? 

निमंत्रण पत्रिका वाटून लोकांना एकत्र करत सोशल डिस्टन्सचा नियम न पाळता ध्वजारोहना सारखा प्रशासकीय कार्यक्रम करणे नियमात बसते का? व शासकीय परिपत्रकात ८-३५ ते ९-३५ या दरम्यान कोणताही शासकीय अथवा निमशासकीय कार्यक्रम करू नये असे आदेश असताना याच ठिकाणी कोरोना योध्दयांचा गौरव समारंभ सकाळी ९-१५ वा करणे, हा नियमाचा भंग करणे नव्हे काय असा प्रश्न कर्जत येथील पत्रकार आशिष बोरा, सुभाष माळवे, भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलूमे यांनी उपस्थित केला. त्यावर संबंधित सर्वांनीच मौन बाळगले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post